google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 9 वर्षीय मुलीवर 70 वर्षीय नराधमाने केला लैंगिक अत्याचार!

Breaking News

9 वर्षीय मुलीवर 70 वर्षीय नराधमाने केला लैंगिक अत्याचार!

 9 वर्षीय मुलीवर 70 वर्षीय नराधमाने केला लैंगिक अत्याचार!

बुलढाणा : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर आरोपी नराधमाचे नाव रामकृष्ण उखर्डा गवई असे आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी कि, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेल्या आरोपी रामकृष्ण उखर्डा गवई याने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी खेळू असे म्हणत आपल्या राहत्या घरी नेले. यानंतर त्याने  मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती मुलीने आपल्या आईला दिली.

दरम्यान, आईने खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपी नराधमाविरुद्ध पोस्कोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments