google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत निवडणूक 2022: भाजपने मारली बाजी; ‘या’ जागी आश्चर्यजनक निकाल

Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक 2022: भाजपने मारली बाजी; ‘या’ जागी आश्चर्यजनक निकाल

 ग्रामपंचायत निवडणूक 2022: भाजपने मारली बाजी; ‘या’ जागी आश्चर्यजनक निकाल

मुंबई : राज्यात रविवारी पार पडलेल्या १८ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपने ३९७ ग्रामपंचायती काबीज करत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. याशिवाय शिंदे गटाने ८१, काँग्रेसने १०४, राष्ट्रवादी काँग्रेस ९८, ठाकरे गटाला ८७ जागी विजय मिळाला आहे. या निवडणुकीच्या निकालात अपक्षांचा बोलबाला बघायला मिळाला असून २०० ग्रामपंचायतीवर अपक्षांनी विजय मिळवला आहे.

गोंदिया जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाल्याचे वृत्त असून इथे पाच पैकी ४ ग्रामपंचायतीवर भाजप तर एका जागी काँग्रेसला विजय प्राप्त झाला आहे. काँग्रेस पक्षाने या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली असून भाजपनंतर काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर विजय साध्य करण्यात यश प्राप्त झाले आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील भणंग ग्रामपंचायतीच्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असून या गावातील जनतेने विशेष एकीचे चित्र निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा भणंग ग्रामपंचायतीत धुव्वा उडाला असून संपूर्ण जागा अपक्षांनी जिंकल्या आहे. या दोन्ही मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारत अपक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, त्यामुळे राज्यभर या ग्रामपंचायतीचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्याची राजकीय स्थिती बघता या निकालाने अनेक मोठ्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून त्यांना राजकीय आकलन करण्यास भाग पाडले आहे. भाजपने जरी बाजी मारली असली तरी अनेक जागी त्यांना निसटता विजय प्राप्त झाला आहे. शिंदे गटाने काही ग्रामपंचायतीवर चांगली कामगिरी केली असून राष्ट्रवादीची पीछेहाट यामुळे होताना दिसली. काँग्रेस पक्ष अजूनही भरारी घेऊ शकतो हे या निकालांनी दाखवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments