google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लम्पी स्कीन डीसीज ची लक्षणे आढळल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तात्काळ संपर्क साधावा.. सांगोला तहसीलदार या. अभिजीत सावर्डेकर पाटील

Breaking News

लम्पी स्कीन डीसीज ची लक्षणे आढळल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तात्काळ संपर्क साधावा.. सांगोला तहसीलदार या. अभिजीत सावर्डेकर पाटील

लम्पी स्कीन डीसीज ची लक्षणे     आढळल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तात्काळ संपर्क साधावा..               सांगोला तहसीलदार या. अभिजीत सावर्डेकर पाटील

सांगोला लम्पी स्कीन डीसीज हा गाय वर्ग मधील विषाणु जन्य आजार असुन सद्या हा रोग महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असुन सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यात आढळून आलेला आहे . सद्या सांगोला तालुक्यामध्ये याचा एकही प्रार्दुभाव आढळुन आलेला नाही . परंतु हा रोग सांगोल्यामध्ये येऊच नये या साठी मा.तहसिलदार साहेब यांचे 


अध्यक्षखतेखाली तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ . अस्लम सय्यद यांनी शासकीय पशुवैद्यकिय डॉक्टर आणि खाजगी पशुसेवा दाते यांचे संयुक्त रित्या आढावा बैठक घेतली गेली या मध्ये लम्पी स्कीन डीसीज या रोगाला घाबरुन न जाणेचे आवाहन केले . हा रोग माणसामध्ये संक्रमीत होत नाही . हा रोग गोचीड , गोमाश्या , मच्छर या मुळे एकठाणावरुन दुसऱ्या ठिकाणी रोग प्रसार होतो .

 त्या साठी आपली जनावरे आपल्या शेताच्या बाहेर इतरत्र कोठेही वाहतुक करु नये . या रोगामध्ये जनावरांना अंगावर मोठ्या गाठी येतात व काही प्रमाणात पायावरती सुज येते . या सारखी लक्षणे दिसुन येतात . हा रोग टाळण्यासाठी रोज संध्याकाळी ६ नंतर कडुलींबाच्या पाल्याचा धुर करावा . 

 मा.तहसिलदार साहेबांनी खाजगी मध्ये लसीकरण उपलब्ध असलेचे सांगितले . आणि खाजगी सेवा दात्यांना ५० रु चे वरती प्रती लसिकरण घेऊ नये असे आवाहन केले . 

डॉ . अस्लम सय्यद यांनी लसिकरणचा डोस प्रति जनावर १ मिली असलेचे सांगितले भारत सरकार यांचेकडील मार्गदर्शक सुचना ) या बाबत कोणीही अपप्रचार करत असेल तर त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल . या मध्ये लम्पी स्कीन डीसीज ची लक्षणे आढळल्यास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तालुका प्रशासनाचे वतीने करणेत आले आहे .

Post a Comment

0 Comments