रेश्मा दिघे यांची राज्यस्तरीय “आदर्श गुणवंत शिक्षक” पुरस्कारासाठी निवड
सांगोला येथील श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालयातील शिक्षिका रेश्मा शिवाजी दिघे यांची युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे दिल्या जाणार्या राज्यस्तरीय “आदर्श गुणवंत शिक्षक” २०२२ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे . युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे प्रत्येक वर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .
रेश्मा दिघे या मागील काही अनेक वर्षांपासून श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालयात विद्यादानाचे पवित्र कार्य करत आहेत तसेच त्यांनी डी . एड विभाग प्रमुख म्हणून ही कार्य पाहिले आहे . याची दखल घेऊन युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्यस्तरीय “आदर्श गुणवंत शिक्षक”२०२२या पुरस्कारासाठी निवड केली आहे .
तसेच हा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू स्मूर्ती भवन दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता देण्यात येणार आहे . अशी माहिती अस्लम नदाफ यांनी दिली आहे . राज्यस्तरीय “आदर्श गुणवंत शिक्षक” पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत . तसेच विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे .


0 Comments