google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री नागन्नाथ घोरपडे यांची राज्यस्तरीय “समाजरत्न ” पुरस्कारासाठी निवड

Breaking News

श्री नागन्नाथ घोरपडे यांची राज्यस्तरीय “समाजरत्न ” पुरस्कारासाठी निवड

 श्री नागन्नाथ घोरपडे यांची राज्यस्तरीय “समाजरत्न ” पुरस्कारासाठी निवड 

सांगोला तालुक्यातील शिरभावी  येथील नागन्नाथ दत्तात्रय घोरपडे यांची  युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे दिल्या जाणार्‍या  राज्यस्तरीय “समाजरत्न ”  २०२२ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे . युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे प्रत्येक वर्षी शैक्षणिक , सामाजिक , क्रीडा , सांस्कृतिक  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .                          नागन्नाथ घोरपडे हे  मागील काही वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत .

 तसेच ते मॅनेजर , व्यवस्थापक ,  सहाय्यक शिक्षक , पत्रकार , सोलापूर जिल्हा प्रमुख , महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्था सांगोला तालुका अध्यक्ष या सर्व पदांवर्ती कार्य करत आहेत .  याची दखल घेऊन युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्यस्तरीय “समाजरत्न”  २०२२ या पुरस्कारासाठी निवड केली आहे .  तसेच हा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी  शाहू स्मूर्ती भवन दसरा चौक  कोल्हापूर  येथे दिनांक  १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता  देण्यात येणार आहे .

 अशी माहिती अस्लम नदाफ यांनी दिली आहे . राज्यस्तरीय “समाजरत्न” पुरस्कारासाठी निवड  झाल्याबद्दल त्यांना युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत . तसेच विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे व त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Post a Comment

0 Comments