google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

Breaking News

खुळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

 खुळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या


शहरातील प्रसिद्ध डॉ . रावसाहेब रेवबा ऊर्फ आर . आर . पवार ( वय 70 ) यांनी त्यांच्या रुग्णालयातच पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता उघडकीस आली . विटा - मायणी रस्त्यावरील - पंचमुखी गणपती मंदिराजवळील पवार हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली . 

विटा ( गांधीनगर ) येथील डॉ . रावसाहेब पवार यांचे येथील पंचमुखी गणपती मंदिराजवळपंचमुखी गणपती मंदिराजवळील शालीमार ज्वेलर्स इमारतीतील मजल्यावर ' पवार हॉस्पिटल ' गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते . डॉ . पवार यांनी काही महिन्यांपासून प्रॅक्टिस बंद केली होती . तरीही ते अधुनमधून रुग्णालयात जाऊन बसत होते . रविवारी ते रुग्णालयात आले होते . त्यांनी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . काही वेळाने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला .

 त्यांनी याची कल्पना तातडीनेत्यांनी याची कल्पना तातडीने पोलिसांना दिली . घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला . डॉ . पवार यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरताच अनेकांना मोठा धक्का बसला . घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती . डॉ . पवार यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी , सून , नातवंडे असा परिवार आहे . आत्महत्येचे नेमके कारण समज शकले नाही

Post a Comment

0 Comments