घरात घुसून महिलेवर बलात्कार फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार
मिरगाव येथे राहणाऱ्या अरविंद नानासो सरक या इसमाने दिनांक०७/०९/२०२२ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गावातील एका घरात महिला एकटीच असताना घरात जाऊन घराची कडी लावून महिला ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करून महिलेशी शारीरिक संबंध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सोबतच या महिलेने हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन हा इसम फरारी झाला आहे
याप्रकरणी 20/ 9 /2022 रोजी साडेआठच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६०/२०२२ याप्रमाणे भारतीय दंड विधान संहिता कलम 376 376 (2)(फ)506 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री डी.सी. गोडसे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस व्ही अरगडे करीत आहेत


0 Comments