google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

Breaking News

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

 वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड (प्रतिनिधी)- वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारी तरुणी उस्मानाबाद जिल्ह्यातील होती, जी शिक्षणासाठी नांदेडला आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होती. गीता दोन दिवसांपासून बेपत्ता होती. २१ सप्टेंबरला गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील एका खोलीत रात्री ११ वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंख्याला दोरी लावून तिने गळफास घेतला होता. 

त्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. घटनास्थळावर एक सुसाईट नोट आढळली आहे. यात वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून गीताने लिहिले आहे. कालपासून गायब असलेल्या या तरुणीने वसतिगृहाच्या एका खोलीत जाऊन ही आत्महत्या केल्याची माहिती काॅलेजच्या प्राचार्यांनी दिली.

ही सुसाईड नोट महिला आयोगाच्या नावाने असल्याची माहिती आहे. याप्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.त्रासाला कंटाळून गीताने टोकाचे पाऊल उचलल्याबरोबर हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments