google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख पदी सागर पाटील

Breaking News

सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख पदी सागर पाटील

 सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख पदी सागर पाटील

सांगोला/प्रतिनिधी ः सोलापूर जिल्हा  युवासेना संपर्कप्रमुख म्हणून  सांगोल्याचे युवा नेते  सागर सुभाषनाना पाटील यांची नियुक्ती युवासेना राज्य सचिव किरण साळी याना आज सोलापूर येथे या निवडीचे पत्र सागर पाटील यांना दिले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी सोलापूर येथे शासकीय विश्राम गृहात जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सागर पाटील यांना निवडीचे पत्र देण्यातआले. आमदार अ‍ॅड.शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा, गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन कराव्यात अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या. 


सागर पाटील यांच्या निवडीमुळे तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण  झाले आहे. सागर पाटील यांना न्याय मिळाला अस कार्यकर्त्या मध्ये बोलले जात आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आम. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहर व तालुक्यासह जिल्ह्यामध्ये शिवसेना बळकट करून युवा सेनेच्या जास्तीत-जास्त शाखा  स्थापन करून पक्ष बळकट करण्यासाठी माझ्यावर पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी निश्‍चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडीन

- सागर पाटील (नुतन युवा सेना संपर्क प्रमुख)

Post a Comment

0 Comments