अहिल्यादेवी होळकर नाव महिला सूतगिरणीला द्या अन्यथा सूतगिरणी समोर वार्षिक सभेच्या दिवशीच उपोषण... प्रफुल्ल कदम यांचा अखेरचा इशारा
प्रफुल्ल कदम करीत आहेत अनेक वर्षे मागणी
शेतकरी सूतगिरणीला गणपतराव देशमुख यांचे तर महिला सूतगिरणीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साठी आग्रह अनेक वर्षे झाली एकाही पत्राला उत्तर न दिल्याची प्रफुल्ल कदम यांची खंत
प्रफुल्ल कदम यांचे पत्र सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल
सांगोला(प्रतिनिधी) - सांगोला महिला सूतगिरणीला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे ही मागणी किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या वेळी करीत असून यावेळी त्यांनी अखेरीस सूतगिरणी व्यवस्थापनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या गुरुवारी दि. 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीमध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नाव शेतकरी सुतगिरणीला देण्याचा विषय बैठकीत घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावा बरोबरच महिला सूतगिरणीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास सर्वसाधारण सभेच्या दिवशीच सूतगिरणी समोर उपोषण करणार असल्याचे इशारा त्यांनी सूतगिरणी व्यवस्थापनाला दिला आहे.
प्रफुल कदम यांनी प्रत्येक वर्षी सूतगिरणी व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. तथापी त्या एकाही पत्राचे उत्तर त्यांना मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संबंधीचे पत्र सोशल मिडीया वर जोरदार व्हायरल झाले आहे त्यांच्या मागणीला जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे.


0 Comments