गुलबर्गा -कोल्हापूर रेल्वे सांगोला थांब्यासाठी प्रवासी आक्रमक अन्यथा इतर रेल्वेचे थांबे रद्द करा :-शहीद अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी)गुलबर्गा- कोल्हापूर -गुलबर्गा 22155 & 22156 या रेल्वेस सांगोल्यात थांबा मिळावा याकरिता शहीद अशोक कामटे संघटनेने गेल्या दहा दिवसांपूर्वी स्टेशनवर निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. याकरिता संघटनेने रेल्वे विभागास स्मरणपत्र दिले आहे.
केवळ रेल्वे वाणिज्य विभाग, सोलापूर येथील एक समिती सांगोला रेल्वे स्थानकावर येऊन येथील असणाऱ्या दैनंदिन रेल्वे तिकीट विक्री विषयी माहिती घेतली यातून त्यांनी सांगोला रेल्वे स्टेशनवर दैनंदिन पंधरा हजार रुपयांचे तिकीट विक्री होणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यामुळे येथील थांबा रद्द केल्याची सांगितले, कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या बंद होत्या ते आता टप्प्याटप्प्याने सुरू होत
आहेत त्यामुळे पूर्वीचा प्रवासी वर्ग रेल्वे पासून दुरावलेला होता त्यानंतरच्या काळात काही प्रमाणात प्रवासी वर्ग जोडला जात होता पण अशा काही धोरणामुळे परिणामी इथून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या अथवा तिकीट विक्री कमी होत आहे जर रेल्वे प्रशासनाने इथून धावणाऱ्या गुलबर्गा- कोल्हापूर -गुलबर्गा सारख्या गाड्यांना थांबा दिला तर रेल्वेचे उत्पन्न वाढेल. या आशयाचे लेखी निवेदन शहीद अशोक कामटे संघटनेने दिले आहे.
रेल्वे महाव्यवस्थापक मुंबई, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांचे याबाबत उदासीन धोरण असल्याचे दिसून येते असे जर असेल तर सांगोला रेल्वे स्टेशन मधून धावणाऱ्या व इतर सर्व थांबणाऱ्या कोणत्याही गाड्यांना थांबा देण्यात येऊ नये. अशी प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी दिसून येत आहे सांगोला रेल्वे स्टेशन बाबत रेल्वे प्रशासन अशी दुपट्टी भूमिका का बजावत आहे याबाबत प्रवाशांना प्रश्न पडला आहे , याबाबत शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वे विभागास स्मरणपत्र पाठवले आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ शिंदे सर यांनी दिली.



0 Comments