google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चो - या करणारे व मोटार सायकल , मोबाईल दुकान फोडुन चोरी करणारे दोन गुन्हेगारांना जेरबंद..

Breaking News

सांगोला पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चो - या करणारे व मोटार सायकल , मोबाईल दुकान फोडुन चोरी करणारे दोन गुन्हेगारांना जेरबंद..

सांगोला पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चो - या करणारे व मोटार सायकल , मोबाईल दुकान फोडुन चोरी करणारे दोन गुन्हेगारांना जेरबंद.. 

 सांगोला पोलीसांनी पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चो - या करणारे व मोटार सायकल , मोबाईल दुकान फोडुन चोरी करणारे ०२ गुन्हेगारांना जेरबंद करून ०६ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचे कडुन गुन्हयातील ८९ , ००० / - रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश


दिनांक ०३ / ० ९ / २०२२ रोजी फिर्यादी सतीश शंकर मदने रा . नरुटेवस्ती , सांगोला ता . सांगोला जि . सोलापुर यांचे शेतातील विहिरी वरून एक सिकोन कंपनीची ३ HP ची इलेक्टीक पाणबुडी मोटार व काळ्या रंगाची केबल वायर ही अज्ञात चोरटयांनी चोरले बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . 

सदर गुन्हयाचा तपास चालु असताना मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सो , मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी व मा . पोलीस निरिक्षक सो , यांनी सांगोला पोलीस ठाणे हददीत पाणबुडी मोटार चो - या वाढत असल्याने एक तपास पथक तयार करून गोपनीय खब - या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरून गेलेल्या मालाचा व आरोपींचा शोध घेतला असता दिनांक २२  रोजी रात्रौ ०७/०० वा . च्या दरम्यान गोपनीय माहीती मिळाली की , 

चिंचोली ता . सांगोला जि . सोलापुर येथील एक इसम जुन्या पाणबुडी मोटार विकत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमांचा नेमलेल्या पथका मार्फत शोध घेतला असता सदर इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांस ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने ब - याच ठिकाणाहून त्याचे ०३ इतर साथीदाराचे मदतीने पाणबुडी मोटार चोरल्याचे कबुली देवुन २ आरोपीना ताब्यात घेवून त्याचे कडुन

 एकुण २ इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार , १ HTP मोटार , व १ हिरो कंपनी मोटार सायकलचे इंजिन , ०१ एस . टी . पी . पाईपचा बंन्डल हस्तगत करण्यात आलेल्या आहे . तरी सदर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल हा अंदाजे ८ ९ , ००० / - रुपये किंमतीचा आहे . तसेच सदर गुन्हयात २ आरोपीना अटक करण्यात आली असून केराप्पा उर्फ किरण तानाजी सरगर व अजय लहू कांबळे. दोघे रा. चिंचोली ता. सांगोला २ आरोपीचा शोध चालु आहे . तरी सांगोला पोलीस ठाणेकडील एकुण ६ गुन्हे उघडण्यात सांगोला पोलीसांना यश आलेले आहे . 

सदर गुन्हयाचा तपास मा . श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम सो पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , मा . श्री . हिम्मत जाधव सो , अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , श्रीमती राजश्री पाटील मॅडम , सो उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , पोनि श्री अनंत कुलकर्णी सो , यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / १५४७ दत्ता बजाळे पोना / १६८२ अभिजीत मोहोळकर , पोना / १४२५ बाबासाहेब पाटील , पोना / ३ ९ ५ अभिजीत सांळुखे , पोना / १७८१ गणेश मेटकरी पोना / १४८ सुनिल मोरे व सायबर पोलीस स्टेशन कडील पोकॉ / २२१६ अन्दर अत्तार यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणला आहे .

Post a Comment

0 Comments