google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत हाकलले

Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत हाकलले

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत हाकलले

मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमुळे अवघा देश हादरून गेलेला असताना, मुरादाबाद येथील घटनेत पाच जणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. शरमेची बाब म्हणजे या नराधमांनी मुलीला तिचे कपडे परत न देता विवस्त्र अवस्थेत हाकलून दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी ही १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तिच्या मित्रांसमवेत गावानजीकच्या जत्रेत गेली होती. रात्री ८ वाजता घरी परतत असताना वाटेतच दोन दुचाकींवर असलेल्या पाचही जणांनी तिचे अपहरण केले व सैदपूर खद्दरच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर या नराधमांनी तिला विवस्त्र अवस्थेत कपडे न देता हाकलून लावले.

यानंतर अनेकांनी तिला रस्त्यावर पाहिले, परंतु लोकांनी तिची मदत करण्याऐवजी चेष्टाच जास्त केली. कसाबसा जीव मुठीत घेऊन पीडित मुलीने घरी पोहोचल्यावर घटनेची आपबिती तिच्या मोठ्या बहिणीला सांगितली. पोलिसांनी तक्रार घेऊन पीडिता व तिच्या काका, मोठ्या बहिणीला आश्वस्त केले व घरी जाण्यास सांगितले.

तब्बल ६ दिवसानंतर पीडितेने एसएसपी हेमंत कुटियाल यांची भेट घेतली. एसएसपी कुटियाल यांच्या आदेशानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचही आरोपींची ओळख पटली आहे. नितीन, कपिल, अजय, इम्रान व नौशे अशी आरोपींची नावे आहेत. यातील नौशे अली यास पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments