google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

Breaking News

मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

 मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा? महापालिकेचा ‘हा’ निर्णय

मुंबई (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेला शिवसेना आणि शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला होता. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालावरून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरेंची कोंडी होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याआधीच महापालिकेने हा निर्णय दिला आहे. शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास. परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे महापालिकेने या पत्रात म्हटले आहे. दसरा मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारल्याने दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. पण शिंदे गटाला बीकेसीवर परवानगी मिळाल्याने तो पर्याय शिल्लक आहे. 

मुंबई पोलीसांनी अहवाल दिल्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. काहीही झाले तरी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा करु, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेनंतर हायकोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या तरी गृहविभागाच्या आडून भाजपाने शिंदे गटाला मदत करत ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासुन शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा असे समीकरण आहे. हा परिसर शांताता क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर सुद्धा विशेष बाब म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती.पण शिवसेनेतल्या फुटीनंतर मेळाव्यावरुन राजकारण सुरु आहे. आता शिवसेना काय करणार हे पहावे लागेल.

Post a Comment

0 Comments