google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी कारवाई ; NIA चे १२ राज्यात छापे, १०६ जणांना अटक

Breaking News

मोठी कारवाई ; NIA चे १२ राज्यात छापे, १०६ जणांना अटक

 मोठी कारवाई ; NIA चे १२ राज्यात छापे, १०६ जणांना अटक 

टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्याप्रकरणी देशभरात PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात  तपास यंत्रणा NIA, ED ने मोठी कारवाई केली आहे. केरळ, तामिळनाडू आणि यूपीसह देशातील 10 राज्यांमध्ये एनआयए आणि ईडीच्या पथकांनी पीएफआयच्या राज्य ते जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवर छापेमारी केली. यानंतर त्यांच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. एनआयए आणि ईडीच्या रडारवर पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम असून ज्यांच्या घरावर मध्यरात्री ईडीने छापा टाकला आहे.

एनआयए आणि ईडीच्या पथकाने राज्य पोलिसांच्या मदतीने दहा राज्यांमध्ये छापे टाकले. यादरम्यान त्यांनी पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकसीसह अनेक ठिकाणी पीएफआय पदाधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली.

चेन्नई पीएफआयच्या पुरसवक्कम येथील राज्य मुख्य कार्यालयातही झडती घेण्यात येत आहेत. मध्यरात्री एनआयए आणि ईडीने ओएमए सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील घरावर अचानक छापा टाकला. अजूनही छापेमारी सुरू आहे. दरम्यान या कारवाईविरोधात आता पीएफआयचे कार्यकर्ते आक्रमक होत आंदोलन करत आहेत.

Post a Comment

0 Comments