google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी : नाशिकमधील खाद्यतेल रिफायनरी वर FDAची धाड, तब्बल १ कोटीचे भेसळयुक्त तेलसाठा जप्त.

Breaking News

मोठी बातमी : नाशिकमधील खाद्यतेल रिफायनरी वर FDAची धाड, तब्बल १ कोटीचे भेसळयुक्त तेलसाठा जप्त.

 मोठी बातमी : नाशिकमधील खाद्यतेल रिफायनरी वर FDAची धाड, तब्बल १ कोटीचे भेसळयुक्त तेलसाठा जप्त. 

आजकालच्या धावपळीच्या काळात आपल्याला स्वयंपाक बवून खाणे अथवा निवडून काही खाद्य पदार्थ आणणे यासाठी वेळ कमी असतो, आणि त्यातच आता भेसळीचे प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणत वाढले आहे. आपण जे रोज जेवणासाठी बनवतो जे वापरतो त्यामधील किती चांगले आणि किती भेसळ आहे हे आपल्याला लक्षात पण येणार नाही.


अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे, नाशिक मध्ये अन्न व औषध विभागाने धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनरी कारखान्यावरती अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकला. आणि त्या ठिकाणी यांना भेसळयुक्त उत्पादन चालू आहे हे उघड झाले.


सदरील तेलाच्या बँड वरती तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात होता मात्र, प्लस चा सिम्बॉल नसल्याचं समोर आलं. हा असा एकूण माल 1 कोटी 10 लाख 11 हजार 280 रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या खाद्यातेलातील वनस्पती तुपाचे बत्तीस नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी खाद्य तेलाने उच्चांक गाठला होता, या तेलाचे दिवसेंदिवस चढते भाव पाहता तेल सर्वसामान्य जनतेला परवडत नव्हता. मात्र खाद्य तेलामध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते व ते आपल्या पर्यंत येते हे यामुळे निदर्शनात येतात. याच भेसळीचा अन्न आणि औषध प्रशासनाने पर्दाफाश केलाय.


या छापेमारीत तब्बल एक कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळ युक्त दर्जाचं तेल या ठिकाणी जप्त करण्यात आला. उच्च प्रतीचे तेल असल्याचे भासवून कमी दर्जाचं तेल ग्राहकांच्या माथी मारल जात होता असा संशय अन्न आणि औषध विभागाला आला आणि त्यानंतरच त्यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments