दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. भावांकडे रक्षाबंधनाला निघालेल्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी मिळाली आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी नाव यमुनेत उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या नावेमध्ये मुलांसह 20 ते 25 महिला प्रवास करत होत्या, या सगळ्या महिला रक्षाबंधनासाठी आपल्या माहेरी निघाल्या होत्या. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी चार जणांचे मृतदेह सापडले असून, 25 जण अजूनही बेपत्ता आहेत.
कसा झाला अपघात
रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरु केला. या नावेमध्ये एकूण 50 जण प्रवास करत होते. जास्त वजनामुळे नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि नदीत पलटी झाली.
बायको आणि मुले गेली वाहून
हि नाव जेव्हा नदीच्या मध्यभागी आली, तेव्हा नाव हलण्यास सुरुवात झाली. नावेतील लोकं घाबरुन नावेतच इकडून-तिकडे जाऊ लागले. यातच एका बाजूला लोकांची संख्या जास्त झाल्यामुळे ती एका बाजूला पलटी झाली. यानंतर बघता बघता अनेकजण या नदीत वाहून गेले. अशी माहिती एका प्रत्क्षदर्शीने दिली आहे.


0 Comments