google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 त्या नटून-थटून ऑफिसला आल्या, अन् लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या.!!!

Breaking News

त्या नटून-थटून ऑफिसला आल्या, अन् लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या.!!!

 त्या नटून-थटून ऑफिसला आल्या, अन् लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या.!!!

कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर तोंड लपवायची वेळ का आली ?

कोल्हापूर  :- रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी त्या अगदी नटून थटून सजून कार्यालयात आल्या, पण काही वेळातच कार्यालयातच पाच हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी भावना चौधरी यांच्यावर आज नटलेल्या अवस्थेतही तोंड लपविण्याची वेळ आली. रक्षाबंधनाला भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी त्यांच्याच हातात बेड्या पडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली.


काल रक्षाबंधन सण. याशिवाय हर घर तिरंगा म्हणत आजपासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही साजरा करण्यास काही ठिकाणी सुरूवात करण्यात आली. दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकारी असलेल्या चौधरी अगदी नटून थटून कार्यालयात आल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच तक्रारदारास त्यांनी कमिशन घेण्यासाठी बोलावून घेतले. आणि पाच हजाराची लाच घेताना त्या कार्यालयातच रंगेहाथ जाळ्यात अडकल्या.


सर्वसामान्य माणूसच काय तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली, पण या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमालाही काळीमा फासला गेला. चौधरी या आरोग्य उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. तक्रारदारास भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज केला होता. तो पुढील वर्षी निवृत्त होणार असल्याने त्याला ही रक्कम मिळणार होती. त्यातील ९० टक्के रक्कमेतील ६ लाख ७२ हजार रूपये मंजूर करण्यासाठी चौधरीनी दहा हजाराची लाच मागितली.


तडजोडीअंती पाच हजार देण्याचे तक्रारदाराने मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर या विभागाने पडताळणी करत सापळा रचला. या सापळ्यात दुपारी चौधरी सापडल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, संदीप पडवळ, मयूर देसाई, पोलीस शरद पोरे, रूपेश माने, छाया पाटोळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments