थरारक ! पंढरपूरला निघालेल्या सात वर्षे वयाच्या बालिकेचे दोन महिलांनीच केले अपहरण .. ! मोहोळमध्ये मुलीची झाली सुटका ! बसस्थानकावरून मुलीला पळवले पण .......
महिलांनीच केले सात वर्षीय बालिकेचे अपहरण !
पुणे : स्वारगेट येथून दोन महिलांनी एका सात वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण करून पळवून नेले परंतु पोलिसांनी चपळाईने तपास करीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून या बालिकेची सुटका करण्यात यश मिळवले आहे . स्वारगेट बस पुण्याच्या स्थानकावरून ८ ऑगष्ट रोजी सात वर्षीय मुलीला पळवून नेण्यात आले होते . सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती . स्वारगेटसारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ देखील उडाली होती .
अंजली सिद्धेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता . गुन्हा दाखल होताच स्वारगेट पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली . या अपहरण प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मोहोळ येथन यामुलीची सुटका केली आहे तर दोन महिलांना अटक करण्यात आली आहे . महिलांनीच या मुलीचे अपहरण केल्याची बाब उघडकीस आली असून आर्थिक व्यवहारातून अपहरणाचे हे नाट्य घडले आहे .
मोहोळ येथील ३० वर्षीय महिला वैशाली पोशंटी शिंदे आणि पुण्याच्या कात्रजमधील ३० वर्षे वयाची रेश्मा समीर शेख या दोन मुलीच्या महिलांना अपहरण प्रकरणी अटक करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील चिखली येथील वीस वर्षे वयाची करिष्मा गोटूराम काळे उर्फ करिष्मा राजू पवार ही मुख्य सूत्रधार असून या तिघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला अंजली शिंदे आणि सूत्रधार करिष्मा यांच्यात काही आर्थिक व्यवहार होते , विशेष म्हणजे या दोघी परस्परांच्या नातेवाईक आहेत . करिष्मा ही अंजलीकडे पैशाची मागणी करीत होती
लोणावळा येथील क्रांतीनगर येथे राहणारी अंजली शिंदे ही पंढरपूर येथे असलेल्या आपल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी निघाली असताकरिष्मा आणि अंजलीची भेट बसस्थानकात झाली होती .करिश्माने वैशाली शिंदे आणि रेश्मा शेख या दोघींशी संगनमत करून अंजलीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले . स्वारगेट पोलिसांनी कात्रज परिसरातून वैशाली आणि रेश्मा याना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आपल्या पद्धतीने आणि कौशल्याने तपास सुरु केला .
अल्पवयीन मुलीला घेऊन करिष्मा येथे ही मोहोळ आईवडिलांच्या गावी आपल्या गेली असल्याची माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळाली . पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचीही मदत घेतली तेंव्हा करीश्माचे लोकेशन कधी पंढरपूर तर कधी मोहोळ परिसरात असल्याचे दिसत होते . स्वारगेट पोलीस करीश्माच्या मागावरच होते . अल्पवयीन मुलीला पळवून करिष्मा सोलापूर जिल्ह्यात पुण्यावरून आली होती . तिचा शोध घेत सावधपणे तिच्या पोलिसही पाठलागावर होते .
दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा करिश्माला लागला आणि आणलेल्या तिने अल्पवयीन पळवून मुलीस आपल्या आई वडिलांकडे चिखली गावात सोडले . मुलीला सोडल्यानंतर ती तेथून पळून गेली . करिष्माच्या आई वडिलांनी अपहृत मुलीला मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले . त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी या मुलीला आपल्या ताब्यात घेतले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले .येथे मुलीच्या अपहरण नाट्याचा प्रवास संपला असून दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे .


0 Comments