google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नळावर गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू !

Breaking News

नळावर गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू !

 नळावर गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू !

मोहोळ : पाणी आणण्यासाठी नळावर गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे आज घडली असून रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडली आहे . 


विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढताना दिसत असून थोडेसे दुर्लक्ष प्राणावर बेतू शकते . परंतु कामाच्या घाई गडबडीत दुर्लक्ष होते आणि जीवाला मुकावे लागते . पाटकूल येथील एका महिलेच्या बाबतीत देखील असेच घडले आणि मृत्यू ओढवला आहे . २७ वर्षीय दिपाली अनिल तांबवे या धुण्यासाठी आणि भांडी धुणे घासण्यासाठी पाणी आणण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावर गेल्या होत्या . या नळाला विद्युत मोटार जोडण्यात आलेली होती . 


दिपाली तांबवे यांचा हात चुकून मोटारीच्या वायरला लागला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्काविजेचा धक्का बसताच त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण नेण्यात रुग्णालयात आले . डॉक्टरांनी त्यांना तपासून पहिले पण उपचाराच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता . याबाबत दीपक सुनील तांबवे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली आहे .  आज रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्यामुळे पाटकुल गावात हळहळ व्यक्त होत आहे . या आहे . या घटनेने गावकऱ्यांना धक्का बसला आहे .

Post a Comment

0 Comments