सांगोला शहरातील रस्त्यावरील खड्डे नगरपालिका प्रशासनाने भरले आधुनिक पद्धतीने ; ना खडी,ना डांबर , ना ग्रिड , मुरमा मध्येच ओके !
तालुका प्रतिनिधी ; सांगोला शहरातील विविध ठिकाणच्या डांबरी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे सांगोला नगरपालिका प्रशासनाने मुरमा ने भरून आधुनिक पद्धत अवलंबल्यामुळे सांगोला शहरातील नागरिकांमध्ये नगरपालिकेच्या या आधुनिक पद्धतीच्या कामाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
सांगोला शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने चौफेर विकास होत असल्याने ,सांगोला शहरामध्ये रहिवास करण्यासाठी लगतच्या तालुक्यातील तसेच इतर ठिकाणच्या हजारो लोक या ठिकाणी येवून वास्तव्य करत आहेत.
त्यामुळे सांगोला नगरपरिषदेस कर रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.
सांगोला तालुका हा प्रामुख्याने डाळिंब, सिमला मिरची, ड्रॅगन फूड,यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे या फळांच्या खरेदीसाठी सांगोला शहरात झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, दिल्ली यासह अनेक राज्यातील सुमारे १५ ते २० हजार मजूर,व्यापारी वास्तव्य करत आहेत.
त्यामुळे सांगोला शहरातील बाजारपेठा गजबजुन जातात त्यामुळे सांगोला शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या खड्ड्यामुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात ही होतात.
सध्याच्या आधुनिक युगामध्ये संपूर्ण भारतात राज्यातील अनेक शहरांमधील रस्त्याची कामे काँक्रीट पद्धतीने सुरू असताना सांगोला शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सांगोला नगरपालिका प्रशासनाने आधुनिक पद्धतीचा अवलंब करून चक्क मुरमानेच सांगोला शहरात पडलेले वेगवेगळ्या ठिकाणचे खड्डे भरून मोठा इतिहास निर्माण केला आहे अशी भावना सांगोला शहरातील सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
यापुढील काळामध्ये सांगोला शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी होणारा लाखो रुपयाचा खर्च न करता डांबरीच्या रस्त्याऐवजी मोफत मिळणाऱ्या मुरमाचेच रस्ते करण्यात यावेत. " ना खडी,ना डांबर, ना ग्रिड , मुरमा मध्येच ओके ! " अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


0 Comments