शिक्षकांचे फोटो वर्गात लावणार… शिंदे सरकारचा मोठा निर्णय…!!
शालेय शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे.. दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, राज्यातील शाळांमध्ये ‘आमचे गुरुजी’ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळेत आता शिक्षकांचे फोटो लावले जाणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिक्षकांबद्दल आदर वाढावा, यासाठी हा प्रयोग राबवित असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अनेक शाळांमध्ये खरे शिक्षक गायब झालेले असतात व त्यांच्या जागी बदली म्हणून नकली शिक्षक शिकवत असल्याचे आढळून आले आहे.. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘आमचे गुरूजी’ ही मोहीम राबवणार असल्याचे सांगितले जाते..
बोगस शिक्षकांना आळा..
या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना नेमके ‘आपले गुरूजी’ कोण, याची माहिती होईल.. शिवाय, त्यातून बोगस शिक्षकांनाही आळा बसेल.. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली..
सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा घेतात, मात्र काम दुसऱ्याचे करीत असल्याचे समोर आले आहे.. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे-पुढे फिरताना दिसतात.. मात्र, शाळेकडे फिरकतही नसल्याचे समजते. काही ठिकाणी नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्याला शिकवण्यासाठी पाठवून देतात..
अशैक्षणिक कामे अध्यापनाच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, शाळेच्या वेळेतच शिक्षक ही कामे करतात.. त्यासाठी फिरतीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम


0 Comments