google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांचे आवाहन; वाढदिवसाला फक्त झाडे भेट द्या

Breaking News

आनंदा माने यांचे आवाहन; वाढदिवसाला फक्त झाडे भेट द्या

 आनंदा माने यांचे आवाहन; वाढदिवसाला फक्त झाडे भेट द्या

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे मा. नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांचा वाढदिवस बुधवार दि. 03 ऑगस्ट रोजी असल्याने त्यांनी त्यांच्या सहकारी, कार्येकर्ते, समर्थक यांना वाढदिवसानिमित्त हार, शाल, फेटे न आणता एक झाड भेट द्यावे असे आवाहन आनंदा माने यांनी केले आहे.

आनंदा माने यांनी स्वतः अनेक सहकारी मित्र, कार्यकर्ते यांचे वाढदिवसानिमित्त व इतर माध्यमातून शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्या झाडांना पाण्याची सोय करून चांगल्या प्रकारे जगविली सुध्दा आहेत. त्यामुळे सांगोला शहर काही वर्षांमध्ये आपणाला भरपूर झाडे असणारे शहर दिसेल. यामुळे आनंदा माने यांना सांगोला शहरातील हरितक्रांतीचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे 

Post a Comment

0 Comments