google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला भुमि अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी, गलथान कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्ट पासून कार्यालयासमोर घंटा नाद अंदोलन करणार ; जय मल्हार क्रांती संघटना

Breaking News

सांगोला भुमि अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी, गलथान कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्ट पासून कार्यालयासमोर घंटा नाद अंदोलन करणार ; जय मल्हार क्रांती संघटना

 सांगोला भुमि अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी, गलथान कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्ट पासून कार्यालयासमोर घंटा नाद अंदोलन करणार ; जय मल्हार क्रांती संघटना

 सांगोला प्रतिनिधी ;-  सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,झिरो कर्मचा-यांचा संगनमताने सुरू असलेल्या मनमानी , गलथान कारभारामुळे सांगोला शहर व तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी, नागरिकांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी या कार्यालयात सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने   दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी पासून  सांगोला भुमि अभिलेख कार्यालया समोर  बेमुदत हलगी नाद अंदोलन करण्यात येणार आहे.

सांगोला येथील भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,झिरो कर्मचारी  हे 


संगनमताने सांगोला शहर व तालुक्यातुन दैनंदिन कामासाठी येणाऱ्या  सर्व सामान्य नागरिकांना जाणीव पुर्वक नाहक त्रास देवून आर्थिक तडजोड करून कामे करत आहेत. या कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कार्यालयात नेमणुकीस असणारे अनेक कर्मचारी शासनाने नेमुन दिलेल्या वेळेत उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.नागरिकांना  वारंवार हेलपाटे मारून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. जे नागरिक आर्थिक तडजोड करतात त्यांचीच कामे केली जातात. जे नागरिक अर्थ पुर्ण वाटाघाटी करत नाहीत त्यांची कामे होत नाहीत.


सांगोला शहर व तालुक्यातील अनेक गावातील अनेक गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत. मोजणी ची प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेकांना माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या अर्जानुसार वेळात माहिती दिली जात नाही. वेगवेगळी कारणे सांगून माहिती देण्यास जाणीव पुर्वक टाळाटाळ केली जाते.

गेल्या काही वर्षात सांगोला शहरातील अनेक सि.स.नं.च्या उता-यावर खाडाखोड करून परस्पर आर्थिक तडजोड करून क्षेत्र वाढवून दिल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.या प्रकरणाच्या अनेक बातम्या प्रसारित झालेल्या आहेत.

अशा प्रकारचा गलथान कारभार राजरोसपणे सांगोला येथील उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी या कार्यालयातील सुरू असलेल्या गैरकारभाराची दखल घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यालयात अधिकारी यांनी नेमणूक केलेला झिरो कर्मचारी लाच घेताना पकडण्यात आला होता. 

हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा या कार्यालयात झिरो कर्मचारी यांचा सुळसुळाट वाढला आहे. या कार्यालयातील काही झिरो कर्मचारी अधिकारी यांचे एजंट म्हणून काम करताना दिसतात.हे झिरो कर्मचारी नागरिकांना आर्थिक गंडा घालून या कार्यालयातील काही अधिकारी,कर्मचारी यांना मलिदा मिळवून देत असल्याची चर्चा राजरोसपणे सुरू आहे.


त्यामुळे सांगोला येथील उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयातील सुरू असलेल्या गलथान कारभाराची तातडीने चौकशी करण्यात यावी.  या मागणीसाठी  १.मा.जमाबंदी आयुक्त सो पुणे                      २.मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर ३.मा.पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण सोलापूर ४.मा.तहसिलदार सो सांगोला ५.मा.पोलीस निरीक्षक सो सांगोला ६.मा.उप अधीक्षक भुमि अभिलेख सांगोला यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments