शहीद कामटे संघटनेच्या वतीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.
महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले खरे योगपुरुष होते :-मुख्याध्यापक रमेश पवार
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशी सामाजिक संघटनेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व विश्वसाहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात पत्रकार संतोष साठे ,मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या हस्ते अनुक्रमे लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी या दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत या महापुरुषांचे अनमोल कार्य अतुलनीय असल्याचे गौरवउद्गार काढले महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले खऱ्या अर्थाने हे युगपुरुष होते, अण्णाभाऊ साठे अल्पशिक्षित असतानाही समाजात चांगले कार्य करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त खडतरे यांनी केले यावेळी संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी व्यापारी यांनी या महापुरुषांना फुले वाहून अभिवादन केले.
0 Comments