मा. नगरसेवक आनंदा माने यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे मा. नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या दि. 03 ऑगस्ट 2022 रोजीच्या वाढदिवसानिमित्त आनंदा(भाऊ) माने मित्र परिवार व राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. 03 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता धनगर गल्ली समाजमंदिर येथे रक्तदान शिबीर, सकाळी 11 वाजता बिलेवस्ती शाळा येथे नितीन देशमुख यांचे वतीने विद्यार्थ्यांस वही वाटप व शाळेस 32 इंची एलईडी टीव्ही भेट, सकाळी 11.30 वाजता बामणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांस आनंदा व्हटे मेजर यांचे वतीने वही वाटप, दुपारी 1 वाजता हर्षदा लॉन्स मिरज रोड येथे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, दुपारी 2 वाजता शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व सांगोला नगरपालिका वृक्ष बँकेस 101 झाडे भेट,
दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत आनंदा माने संपर्क कार्यालय वंदे मातरम् चौक एखतपूर रोड, सायंकाळी 5.15 वा. पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन येथे गाण्यांचा कार्यक्रम, रात्री 7 वाजता चांडोलेवाडी येथे भारूडाचा कार्यक्रम, रात्री 7.15 वा. पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन येथे नागरी सत्कार व डॉ. स्वागत तोडकर यांचे घरगुती निसर्गोपचार पध्दती यावरील माहिती व रात्री 8 वाजता आनंदनगर येथे विद्यार्थ्यांस वही वाटप अशा पध्दतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच वाढदिवसासाठी कुणीही हार, शाल, फेटे आणू नयेत, त्याऐवजी एक झाड भेट द्यावे, असेही आवाहन मा. नगरसेवक आनंदा माने यांनी केले आहे.
0 Comments