google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादीचा पंढरपुरातील मोठा नेता शिंदेंच्या गळाला ? शहाजीबापूंच्या मध्यस्तीनं कल्याणराव काळे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

Breaking News

राष्ट्रवादीचा पंढरपुरातील मोठा नेता शिंदेंच्या गळाला ? शहाजीबापूंच्या मध्यस्तीनं कल्याणराव काळे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचा पंढरपुरातील मोठा नेता शिंदेंच्या गळाला ? शहाजीबापूंच्या मध्यस्तीनं कल्याणराव काळे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

 पंढरपूर : राज्यातील सत्तांतरानंतर आता विरोधातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील  प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय.

पंढरपूरमध्येही राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महत्वाची बाब म्हणजे या नेत्यासाठी ‘काय डोंगर, काय झाली, काय हॉटेल’ या एका डायलॉगने फेमस झालेले शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील एक गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते कल्याणराव काळे एकनाश शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती नागेश भोसलेही शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शहाजीबापू पाटील यांच्या मध्यस्थीनं हे प्रवेश होणार असल्याचं कळतंय. आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर पंढरपुरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


कोण आहेत कल्याण काळे?

>> कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव

>> 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

>> माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

>> राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

>> भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

>> सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

>> श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

>> सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

>> सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले होते

>> राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष


अर्जुन खोतकरही शिंदे गटात

चार दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समर्थन देण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी त्यांची मुख्य अडचण काय आहे याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आज जालन्यात येऊन निर्णय घोषित करतोय. आज संजय राऊत, विनोद घोषळकर, नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. घरी आलं की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचे आहेत. मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि यासंदर्भात ते बोलले. मी आज सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागतोय.

Post a Comment

0 Comments