google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' हर घर तिरंगा ' अभियानांतर्गत आरएसएसच्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात यावा : आरपीआय तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे

Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' हर घर तिरंगा ' अभियानांतर्गत आरएसएसच्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात यावा : आरपीआय तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' हर घर तिरंगा ' अभियानांतर्गत आरएसएसच्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात यावा : आरपीआय तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावी होलार समाजातील प्रकाश तालिकोटे या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी बुधवार दि . १० ऑगस्ट रोजी आरपीआय ( आठवले ) च्या वतीने निवेदन देणार

सांगोला / प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठडड नागपूर यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात यावा . तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावी होलार समाजातील प्रकाश तालिकोटे या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी , अशा मागणीचे निवेदन आरपीआय तालुकाध्यक्ष सुरज दादा बनसोडे बुधवार दि . १० ऑगस्ट रोजी तहसीलदार अभिजीत पाटील यांना देणार आहेत . संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भाजप सरकारने हर घर तिरंगा हे अभियान शासनातर्फे राबवले जात आहे . हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे . प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा लावणे हे कर्तव्य असून , त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटलापाहिजे . 


परंतु आर . एस . एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवला जात नाही असे समजले आहे . ही संघटना तिरंग्याला मानत नाही का यांना स्वातंत्र्यच मान्य नाही हा संशोधनाचा विषय आहे . आर . एस . एस . ही संघटना भाजपशी संलग्न आहे . तरी या देशाचे पंतप्रधान हे भाजपचे असून , त्यांनी देशातील सर्व भारतीयांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आव्हान केले असून , शासकीय कार्यालयाकडून ( तहसील व नगरपालिका ) मोफत झेंडे वाटप चालू आहे . 


त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर . एस . एस . या संघटनेचे प्रमुख मोहन भागवत यांना निदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आर . एस . एस . संघटनेच्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यास विनंती न करता सतीचा आदेश करावा ही संपूर्ण भारतीयांची इच्छा आहे . म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने आर . एस . एस . च्या मुख्यालयासतहसीलदार यांच्यामार्फत तिरंगा पाठवण्यात येणार आहे . 


तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावी मागासवर्गीय जातीतील होलार समाजातील प्रकाश तालिकोटे यांच्या घरी लग्न कार्यामध्ये विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजले असताना ते गाणे वाजवायचे नाही असे म्हणून त्या गावचे सरपंच रमेश राठोड यांनी त्यांचे जातीवादी गावगुंड गोळा करून तालिकोटे कुटुंबास अमानुष मारहाण केली व लग्न असलेल्या मुलीस नीवस्त्र करून मारहाण केली . सदरचा प्रकार हा लोकशाही असलेल्या देशात घडणे ही लाजिरवाणी व निंदनीय बाब आहे .


 देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे दलित , मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे . तरी या प्रकरणातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी . अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) च्या वतीने देशभरामध्ये तीव्र निदर्शने केली जातील याची नोंद घ्यावी , असा इशारा यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष सुरज दादा बनसोडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे . सदर निवेदन देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आरपीआय तालुकाध्यक्ष सुरज दादा बनसोडे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments