शेकापचा सुवर्णकाळ समीप ; डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने शेकापला तरूण व संयमी नेतृत्त्व – प्रा. विशाल सरतापे
शेकापचा सुवर्णकाळ समीप ; डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने तरूण व संयमी नेतृत्त्व
भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 3 ऑगस्ट 1948 .2022 साल हे पक्षाचे हीरक महोत्सव वर्ष साजरे होत असताना राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून “शेकाप म्हणजे मोठ्या नेत्यांचा छोटा पक्ष” ही उपेक्षा केली जाते.ती मनाला क्लेशकारक आणि न पटणारी आहे.शेकापचा इतिहास हा क्रांतिकारी इतिहास आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेचा इतिहास जर बघितला तर श्रमिक,कामगार,मजूर,उपेक्षित गटाची अवहेलना सहन होत नाही .म्हणून भाऊसाहेब राऊत,केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे या नेत्यांनी काँग्रेस पक्षांतर्गत एक गट स्थापन केला.त्यावेळी नेहरू व काँग्रेस श्रेष्ठींनी पक्षांतर्गत गट स्थापन करण्यास बंदी घातली होती.अशा परिस्थितीत सुद्धा उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी गट स्थापन केला. काॅग्रेस पक्षशिस्त मोडली म्हणून राऊत,जेधे,मोरे यांची पक्षातून हकालपट्टी केली.असेही विश्लेषण केले जाते.हकालपट्टी केली असे म्हणण्या ऐवजी राऊत, जेधे, मोरे यांना पक्षातून अलगद बाजूला केले.
यावेळी या नेत्यांना पक्ष कार्यकारिणीतून बाजूला करण्याचा हेतू नीट समजून घेतला पाहिजे. संविधानाने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला असताना सुद्धा नेहरूंच्या निधनापर्यंत म्हणजे 1964 सालापर्यंत काँग्रेस पक्षाला आणि पक्षीय धोरणांना विरोध करू शकेल असा एकही पक्ष किंवा संघटना भारतीय राजकारणात प्रभावी नव्हती. आणि त्याचा परिणाम काँग्रेस एकमुखी निर्णय घेत होती.म्हणजे पक्षात एकाधिकारशाही प्रबळ होती.त्या एकाधिकारशाहीला धक्का लागू नये याची तंतोतंत काळजी काँग्रेसचे धुरंदर नेते त्या काळात घेत होते.आणि म्हणूनचराऊत, जेधे, मोरे यांच्यावर कारवाई झाली.
या कारवाई नंतर राऊत जेधे,मोरे यांनी 2 व 3 ऑगस्ट 1948 रोजी शेतकरी व कामगारांचे एक अधिवेशन घेवून पक्षाच्या स्थापनेचा उद्देश आणि जाहीनामा प्रसिद्ध केला.काँग्रेसच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणाला प्रतिकार करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. मार्क्सवादी तत्वज्ञान आणि कामगारांचे,मजूराचे श्रमिकाचे,उपेक्षित वर्गाचे हीत हाच पक्षाच्या स्थापनेचा मुलाधार होता.1948 ते1956 भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्णकाळ होता.
शंकरराव मोरे यांनी ग्रामीण भागातील उपेक्षित, पिडीत समाजात परिवर्तन करणेसाठी प्रबोधन करून पक्षाची धोरणे सोप्या भाषेत खेडूतांना समजतील,आणि पचतील अशा उदाहरणातून साध्या भाषेत कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानांची मांडणी केली. आणि त्यामुळेच शेतकरी कामगार पक्ष आणि पक्षाचे तत्वज्ञान माणणारा सामान्य माणूस संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ताकदीने उतरला. 1952 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचे 28 आमदार निवडून आले होते.शंकरराव मोरे व इतर काहीजण लोकसभेतही निवडून गेले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कालखंडात भाई.प्रा.एन.डी पाटील यांनी महाराष्ट्र शेकाप चे नेतृत्त्व केलं.एन.डी पाटील यांना उध्दवराव पाटील, भाई डाॅ. गणपतराव देशमुख, क्रांतिसिंह नागनाथ आण्णा नायकवडी, आण्णासाहेब गव्हाणे,दाजीबा देसाई,क्रूष्णराव धुळप ,जी.डी लाड , विठ्ठल हांडे यांची साथ मिळाली. 1956 साली नेहरूनी फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करून भाषिक आधारावर घटक राज्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला.आणि देशात प्रादेशिक वाद,भाषावाद हे नवे मुद्दे राजकारणाचे केंद्रबिंदू बनले.आणि मग यातच लोकांना गुंतवून काँग्रेस आणि नेहरूनी भांडवलदार वर्ग हाताशी धरून कामगार चळवळ मोडीत काढली .आणि त्याचा परिणाम भारतीय शेतकरी कामगार पक्षावरही झाला.
पक्ष क्षिण झाला.पण मार्क्सवादी तत्वज्ञान समजलेले ,पक्षाचे तत्वज्ञान समजलेलेगणपतराव देशमुख, एन.डी पाटील व त्यांचे सहकारी कामगार, मजूर, श्रमिक, उपेक्षित वर्गाचे हित लक्षात घेवून संघर्ष करत राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करण्याचे व्रत घेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीले.
कालांतराने देशाच्या राजकारणात आणि राजकारणी लोकांत पद,सत्ता,संपत्ती महत्वाचे बनले.पण शेकाप पक्षानेही आणि पक्षाच्या नेतृत्त्वाने ही पक्षाचे तत्वज्ञान कधी डावलले नाही. आणि त्यामुळे पक्षाच्या तत्वज्ञानाची जनमाणसावर एवढी छाप पडली की,चार पिढ्या आणि येणार्या कैक पिढ्या शेकाप ला कट्टर मतदार मिळतो. ही जमेची बाब आहे. सामाजिक आणि राजकीय संक्रमणे अनेक आली.त्याचा परिणाम शेकाप क्षिण झाला असे वाटत असताना तरूण पिढीतील विचारांवर आणि तत्वज्ञानावर निष्ठा असणारे भाई जयंत पाटील, भाई विवेक पाटील, बाळाराम पाटील, मिनाक्षी पाटील, धैर्यशीला पाटील, डाॅ बाबासाहेब देशमुख , डाॅ.अनिकेत देशमुख, बाळासाहेब काटकर, डाॅ बाबासाहेब करांडे, असे जेष्ठ व तरून नेते पक्षाला मिळाले आहेत.
ज्यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.शेकाप पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेला पक्षाचे तत्वज्ञान आणि विचार धारा समजलेले उच्च विद्या विभूषित डाॅे .बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने तरूण व संयमी नेतृत्त्व लाभले आहे.ज्याना जनतेची कणव आणि जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे.आणि त्यामुळे पक्षाला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला हे बघता, राजकीय विश्लेषण करताना विश्लेषक शेकाप ची ओळख “मोठ्या नेत्यांचा छोटा पक्ष ” अशी ओळख करून देण्याच्या ऐवजी “तत्वनिष्ठ कार्यकर्ते व मतदारांचा महान पक्ष” अशी करून देतील..आणि तो “सुवर्णकाळ समीप आला आहे.
” शेकाप येणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपालिका,महानगरपालिका,तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीत लोकांचा विश्वास संपादन करेल.व पुन्हा एकदा लालबावटा डौलात फडकेल असा आशावाद निर्माण झाला आहे.त्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचेमेळावे,शिबीरे,प्रशिक्षण वर्ग,मतदार नोंदणी अभियान जोमाने सुरू करावी लागतील,पक्ष सभासद नोंदणी वर्ग भरवावे लागतील .नुकत्याच झालेल्या पणवेल मेळावा प्रसंगी पक्षाच्या कार्यकर्यांचा व मतदार व सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद हा शेकापचा सुवर्णकाळ अधोरेखित करणारा वाटतो.
प्रा. विशाल भागवत सरतापे
मु.पो.महुद ता.सांगोला, जि.सोलापूर
(श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती )


0 Comments