google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद वृक्षबँकेस 201 झाडे भेट व विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Breaking News

आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद वृक्षबँकेस 201 झाडे भेट व विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद वृक्षबँकेस 201 झाडे भेट व विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपरिषद वृक्षबँकेस 201 झाडे भेट देण्यात आली असून नगरपरिषदेच्या वतीने सदरची झाडे लावून ती व्यवस्थितरित्या वाढवली जाणार आहेत. त्याचबरोबर क्रीडा संकुल याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.


यासह मुजावर गल्ली येथे सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुजावर गल्ली येथील ईलाही मुजावर, महामुद मुजावर, आंबीर मुजावर, तोफिक मुजावर, साहील खतीब, फिरोज खतीब, जाकीर मुजावर, अल्लाऊद्दीन खतीब, खलील मुजावर, आमीर खतीब, तोफीक मुलाणी, मुबीन मुजावर, शबाब मुजावर, मुजम्मील मुजावर, तोहिद शेख, मोहम्मद मुजावर, साहिल खतीब, जावेद मुलाणी, शकील मुजावर, सिराज काझी आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments