आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त बिलेवाडी शाळेस एलईडी टीव्ही भेट
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलेवाडी येथे 32 इंची एलईडी टीव्ही नितीन देशमुख व मातोश्री कुसुम टापरे फाउंडेशन कडलास यांचे वतीने भेट देण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी आनंदा (भाऊ) माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूनम शिरसाठ बोलताना म्हणाल्या की, या एलईडी टीव्हीमुळे आमची प्रशाला डिजिटल झाली असून यामुळे मुलांना टीव्हीमध्ये मोबाईलवरील युट्युबवरील कार्यक्रम दाखवता येतील. दीक्षा अॅप, रीड टू मी या शैक्षणिक अॅपचा वापर करून मुलांच्या अध्ययनात चांगल्या प्रकारे मदत होईल. त्याचप्रमाणे प्रशालेच्या वॉल कंपाऊंड बाबतची मदत करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या शैक्षणिक मदतीबद्दल त्यांनी संयोजकांचे आभारही मानले.
यावेळी आनंदा(भाऊ) माने यांना शुभेच्छा देण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments