मोठी बातमी! अखेर केंद्रसरकारकडून ‘वर्क फ्रॉम होमची’ नियमावली जाहीर
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जगभरातील लॉकडाऊनमुळे कार्यालयीन कामकाज घरूनच करावे लागले. यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांनी ऑफिस कल्चर हे वर्क फ्रॉम होम केले आहे. भारतातही याबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार दीर्घकाळ सुरू आहे. यासोबतच केंद्राकडून कामाच्या वेळा आणि रजा यावरही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.
आता केंद्रसरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून ‘वर्क फ्रॉम होम’बाबत एक महत्वाची बातमी समोर येथे आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून देशात वर्क फ्रॉम होम संबंधित नवीन नियम जाहीर करण्यात आले असून या मध्ये जास्तीत जास्त एक वर्षासाठी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. हा नियम एकूण कर्मचार्यांच्या 50 टक्क्यांपर्यंत अंवलंबता येऊ शकतो. वाणिज्य विभागाने विशेष आर्थिक क्षेत्र नियम 2006 मध्ये घरून काम करण्यासाठी नवीन नियम 43A अधिसूचित केले आहे.
कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही संधी :
SEZ युनिट्समध्ये काम करणार्या काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली असून यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि एसईझेड युनिट्समध्ये काम करणाऱ्या संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसचे जे कर्मचारी तात्पुरते कामावर येऊ शकत नाहीत ते देखील याच्या कक्षेत येतील.
भारतात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून वर्क फ्रॉम होम करण्याची वाढ झाली असून लॉकडाऊन दरम्यान अनेक संस्थांनी घरून काम करवून केले. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाल्याने आता पुन्हा एकदा सर्व संस्था सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक संस्था आजही ‘वर्क फ्रॉम होम’चीच अंमलबजावणी करत आहेत.


0 Comments