संपुर्ण देशभरात नावाजलेली एकमेव महाराष्ट्रीयन सर्कस पंढरपुरात दाखल... सुपर स्टार सर्कसचा उद्या होणार उद्घाटन समारंभ..
सर्कस हा शो सर्वांनाच आवडत असतो..लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सर्कस पाहायला आवडते. सर्कसच्या माध्यमातुन कलाकार आपली कला सादर करत असतात ..खरे तर सर्कस म्हणजे तारेवरची कसरतच आहे.. अशी एक भव्य दिव्य सर्कस दर वर्षीप्रमाणे खास आषाढी वारी निमित्त पंढरीत दाखल झाली असून संपूर्ण भारतात नावाजलेली एकमात्र महाराष्टीयन सर्कस म्हणून ओळखली जाणारी ही सर्कस आहे “सुपर स्टार सर्कस ही नुकतीच पंढरपुर शहरात दाखल झाली आहे या सर्कसचा पहिला शो उद्या दिनांक 5 जुलै 2022 वार सोमवार रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता सुरु होणार आहे.
सदर शोच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, शिवसेना नेते जयवंत माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान सर्कस पाहण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी, माता भगिनींनी व अबाल वृद्धांनी येऊन एक वेळ अवश्य सर्कस पाहण्याचा आनंद घ्यावा व आम्हाला सेवेची संधी द्यावी अशी आग्रहाची विनंती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी यावेळी तमाम नागरिकांना केली आहे.
पंढरपूरात दाखल झालेल्या सुपरस्टार सर्कसमध्ये नेपाळ, आसाम, केरळ, तामिळनाडु, गुजरात, महाराष्ट्रसह विविध राज्यातील कलाकारांचा समावेश आहे. सदर सर्कसमध्ये विविध प्रकारचे नाविन्यपुर्ण व नेत्रदिपक प्रयोग सादर केले जाणार आहेत. सांगली कोल्हापूर सातारा सह विविध जिल्ह्यात ही सर्कस नावजलेली सर्कस म्हणून ओळखली जाते. या सुपरस्टार सर्कसमध्ये एकूण ८० कलाकार असून हे सर्व कलाकार विविध कला व प्रयोग सादर करणार आहेत.
दरम्यान कोरोना महामारीच्या काळात या कलाकार लोकांचे फार हाल झाले होते. सर्कस मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते याबाबत सर्कसचे मालक श्री प्रकाश माधव माने यांनी सुद्धा ही बाब स्पष्ट केली आहे. कोरोना काळात आम्हा कलाकारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरून न येणारे असून यामध्ये आम्हाला उपजीविका करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली होती.
लॉकडाऊन झाल्यानंतर सर्कस बंद झाली होती. दरम्यानच्या काळात मी माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन महामारीचा सामना केला आहे. या दरम्यान सर्कस बंद असताना त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न देखील गंभीर बनला होता अशा परिस्थितीत काही चांगली माणसे देवासारखी भेटत गेली. ज्यांनी लॉकडाऊन नंतरच्या काळात आम्हाला मोलाचे सहकार्य केले. ज्यामुळे कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागला.
गेल्या तीन पिढ्यापासून मी सर्कसचा व्यवसाय चालवित असून या सर्कसमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कलाकारांना जगविण्यासाठी गेली दीड ते दोन वर्ष आम्हाला फार त्रास सहन करावा लागला आहे. सर्कस पाहण्यासाठी येणारे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील आपण प्रेक्षक हेच माझे दैवत आहात .तरी आपण सर्वानी ही सर्कस पाहण्यासाठी सहकुटंब सहपरिवार उपस्थित राहून एकवेळ सर्कसचा आनंद घ्यावा व ही सर्कस पहावी असे आवहान सर्कसचे मालक श्री प्रकाश माधव माने यांनी यावेळी केले आहे.
आपण विविध सर्कस पहिल्या असतील विविध भागातील सर्कस पाहण्याचा आनंद लुटला असेल मात्र आपण ही सर्कस देखील एकदा आवश्य पहावी. असे आवाहन श्री प्रकाश माने यांनी यावेळी केले आहे. यावेळी सुपरस्टार सर्कसचे व्यवस्थापक श्री ज्वालासिंग उपस्थीत होते. सदर सर्कसच्या शो ची वेळ दुपारी 1 वाजता पहिला शो होईल तर दुपारी 4 वाजता दुसरा शो होईल तर सायंकाळी 7 वाजता शेवटचा शो असेल..या प्रमाणे या सुपरस्टार सर्कसचे दररोज तीन शो असणार आहेत..
या सुपरस्टार सर्कस करिता अत्यंत माफक दरात तिकिट दर असून तिकिटाचे दर खालील प्रमाणे आहेत.
गँलरी करिता तिकीट दर रु. १००/-
खुर्ची करिता तिकीट दर रु.२००/-
व्हीआईपी करिता तिकीट दर रुपये .२५०/-
स्टार सर्कल करिता तिकीट दर रुपये.३००/-
सर्कस पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे सदर सर्कस पाहण्यासाठी पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी एक वेळ अवश्य यावे असे आवाहन श्री प्रकाश माधव माने यांनी केले आहे
सर्कसचे ठिकाण:- सरगम चौक, स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या मागील बाजूचे पटांगण. के.बी.पी.कॉलेज रोड, पंढरपूर.


0 Comments