Breaking News

अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवत डॉक्टरने केला लैगिंक अत्याचार...

अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवत डॉक्टरने केला लैगिंक अत्याचार...


मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेवून तीच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका खाजगी डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉक्टर हरिप्रसाद पत्की (रा.सलगर बु.)  याला तात्काळ गजाआड केले आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 9 वर्षीय मुलगी दि.2 रोजी दुपारी 1.30 वा. खाजगी शिकवणीला जात असताना तीला बोलावून


खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून दवाखान्यात नेवून जबरी संभाेग केला असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केल्यावर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सलगर येथे जावून रातोरात आरोपीस गजाआड केले आहे. या घटनेने त्या डॉक्टरच्या कृत्याबाबत संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.


घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीस अद्दल घडविण्यासाठी चांगला चोप दिल्याचीही चर्चा आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि.376 अ,ब,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण,व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments