google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस पक्ष अक्कलशून्य…; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

Breaking News

काँग्रेस पक्ष अक्कलशून्य…; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

 काँग्रेस पक्ष अक्कलशून्य…; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा भाजपला पर्याय होऊ शकत नाही. 2024 च्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थान दिल्यासच भाजपला आपण हरवू शकतो. मात्र, काँग्रेसचे आतापर्यंतचे राजकारण हे दिवाळखोरीचे राहिले आहे. काँग्रेस पक्ष अक्कलशून्य झाला आहे,” अशी घणाघाती टीका आंबेडकर यांनी केली आहे.


प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहांसमोर पक्ष झोपला आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा आदिवासी असावा, असे मी अगोदरच विरोधकांना कळवले होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही. काँग्रेसने अक्कलशून्य कारभार केला. भाजपने आदिवासी उमेदवार दिला. तो आपल्याला देता आला नाही. हे मान्य करायला हवे होते. पण तेवढी दानत काँग्रेसकडे नाही भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या पाठींब्याबाबत आंबेडकर म्हणाले, “माझ्याकडे मुर्मू यांना पाठींबा देण्यासाठी एकही मतं नाही. मात्र, मुर्मू यांना पाठिंबा मिळेल. कारण 70 वर्षानंतर आदिवासी देशाचा राष्ट्रपती होत आहे. त्यामुळे त्यांना सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments