अंकले ते डोरली रस्त्यामधील ब्रम्हनाथनगर शेजारी सिमेंट पाईप खचला
सतत रिमझिम पावसामुळे अंकले ते डोरली रस्त्यामधील ब्रम्हनाथनगर शेजारी कॅनॉल जवळ रस्त्याखालून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी घातलेली सिमेंट पाईप खचला. आहे.
डफळापुर अंकले डोरली ढालगाव नागज मार्गे गुहागर सोलापूर हायवेस मिळतो, त्यामुळे दिवसभर जास्त प्रमाणात वाहतूक असते.सिमेंट पाईप खचल्यामुळे लहान मोठी वाहने अडकुण अपघात होऊन जिवित हानी होऊ शकते.
जिवित हानी टाळण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करावी असे डोरली पंचक्रोशीतील नागरिकांनकडुन मागणी होत आहे.



0 Comments