Breaking News

नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ ठिकाणी उडणार राजकीय धुरळा..!!

 नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ ठिकाणी उडणार राजकीय धुरळा..!!

राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी आहे.. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 8) या निवडणुकांच्या घोषणा केली. पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे..

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान व दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे…. मात्र, ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम असून, या निवडणुका ‘ओबीसी’ आरक्षणाशिवायच होणार असल्याचे बोलले जाते. निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेल्या ठिकाणी आजपासूनच (ता. 8) आचारसंहिता लागू झाली आहे..

निवडणुकीचे वेळापत्रक


20 जुलै – जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

22 ते 28 जुलै – संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरणे

29 जुलै – छाननी व वैध नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार

4 ऑगस्ट – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार.

18 ऑगस्ट – मतदान

19 ऑगस्ट – मतमोजणी

या नगरपालिकांच्या निवडणुका

‘अ’ वर्ग 


भुसावळ (जि. जळगाव), बारामती (जि. पुणे), बार्शी (जि. सोलापूर), जालना (जि. जालना), बीड (जि. बीड), उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

‘ब’ वर्ग


नाशिक – मनमाड, सिन्नर, येवला

धुळे – दोंडाईचा-वरवाडे, शिरपूर-वरवाडे

नंदुरबार – शहादा

जळगाव- अमळनेर, चाळीसगाव

अहमदनगर- संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर

पुणे – चाकण, दौंड

सातारा – कराड, फलटण

सांगली – इस्लामपूर, विटा

सोलापूर – अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर – जयसिंगपूर

औरंगाबाद – कन्नड, पैठण

बीड – अंबेजोगई, माजलगाव, परळी-वैजनाथ

लातूर – अहमदपूर

अमरावती – अंजनगाव-सुर्जी

नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर

जळगाव – वरणगाव, धरणगाव,  एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल

अहमदनगर – जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहाता, राहुरी

पुणे – राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर

सातारा – म्हसवड, रहिमतपूर, वाई

सांगली – आष्टा, तासगाव, पलूस

सोलापूर – मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मेंदगी, मंगळवेढा, सांगोला

कोल्हापूर – गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव

औरंगाबाद – गंगापूर, खुलताबाद

जालना – अंबड, भोकरदन, परतूर

बीड – गेवराई, किल्ले धारुर

उस्मानाबाद – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर

लातूर – औसा, निलंगा

अमरावती – दर्यापूर

बुलडाणा – देऊळगाव राजा

4 नगरपंचायती

Post a Comment

0 Comments