ओसवाल नावाच्या कार्यकर्त्याने शहाजीबापूंचा चक्क मुका घेतला.
“आमी सध्या गुहाटीमधी हाय.. काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील” या शहाजीबापूंच्या डायलॉगने राज्याला इतकी भुरळ पाडली आहे की, शिंदे – फडणवीस यांच्या नवोदित सरकारची चर्चा घडून येण्याऐवजी सर्वत्र शहाजीबापूंचीच चर्चा होताना दिसत आहे.
“आमी सध्या गुहाटीमधी हाय.. काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील” या अजरामर डायलॉगचे उद्गाते तथा कविमनाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरील प्रेम अनावर झाल्याने एका कार्यकर्त्याने शहाजीबापूंचा चक्क मुका घेतला. शहाजीबापूंना आणखी कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे ते देवच जाणो.
मुका घ्या मुका (विडीओ पहा)
ही घटना मुंबईत घडली आहे. “आमी सध्या गुहाटीमधी हाय.. काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील” या शहाजीबापूंच्या डायलॉगने राज्याला इतकी भुरळ पाडली आहे की, शिंदे – फडणवीस यांच्या नवोदित सरकारची चर्चा घडून येण्याऐवजी सर्वत्र शहाजीबापूंचीच चर्चा होताना दिसत आहे.
शहाजीबापूंच्या बातम्या सर्वाधिक पाहिल्या जात असल्यामुळे राज्यातल्या सर्व आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी शहाजीबापू यांच्या संबंधातील एकही बातमी मिस होऊ देवू नये असे फर्मानच जणू आपल्या वार्ताहरांना काढले आहे. दोन दिवसांत राज्यातल्या सर्व आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी शहाजीबापू यांना आपल्या स्टुडिओत बोलावून प्रकट मुलाखती घेतल्या आणि प्रसारित केल्या. त्यामुळे शहाजीबापू पुन्हा एकदा घराघरात पोहोचले. ते सोशल मीडियातून मागील पंधरा दिवसांपूर्वीच पोहोचले होते. शहाजीबापू यांच्या लोकप्रियतेचा फिवर मागील पंधरा दिवसांपासून कायम आहे. त्यांचे डायलॉग अजूनही ट्रेडिंगमध्ये आहेत.
शहाजीबापू स्पेशल
कार्यकर्त्याने घेतला चक्क मुका
त्याचे झाले असे, शहाजीबापू हे सध्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये एक कार्यकर्ता त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्याने शहाजीबापू यांची भेट घेतली. गप्पा मारल्या. आणि शहाजीबापू यांच्यावरील प्रेमापोटी त्याने चक्क शहाजीबापू यांचा मुकाच घेऊन टाकला.. ओसवाल असं या कार्यकर्त्यांचे नाव असून, तो पुण्यातील एक उद्योजक असल्याचा समजते. मुका घेतल्याचा हा फोटो सोशल मीडियावर आला आहे. दादा कोंडके यांच्या “मुका घ्या मुका” चित्रपटातल्या कॅप्शन घेऊन बापूला सोशल मीडियावर पुन्हा एकदा बापूंची हवा होताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांचे अतोनात प्रेम
शहाजीबापू हे तसे सांगोला तालुक्यातील रांगडे राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेतील सहज वावर ही त्यांच्या लोकप्रियतेची महत्त्वाची कारणे आहेत. शहाजीबापू आमदार असोत अथवा नसोत त्यांच्या भोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असतो. आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने देवाला बोकड कापले असेल तर तो बापूंना हमखास जेवायला बोलवतो. बापू मोठ्या आपुलकीने अशा देवकार्यात सहभागी होतात आणि मटणाच्या रश्यावर मनसोक्तपणे ताव मारतात. आणि मग अशा ताव मारण्याच्या नादात आणि सततच्या मटण खाण्यामुळे वजन वाढल्याचेही बापूंनी आपल्या अनेक भाषणांमध्ये सांगितले आहे.
असे असले तरी बापूंचे आपल्या कार्यकर्त्यावरील प्रेम कमी झाले नाही आणि कार्यकर्त्यांचे बापूवरील प्रेम कमी झाले नाही. मध्यंतरी झालेल्या सत्तांतराच्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा शहाजीबापू यांच्यावरील प्रेम अधोरेखित किंबहुना घट्ट होताना दिसत आहे. मुंबईत घडलेली ही “मुका” घटना त्याचेच प्रतीक म्हणावे लागेल. यातील विनोदाचा भाग सोडला तर सध्याच्या ताण-तणावाच्या आणि प्रचंड बदनाम होत चाललेल्या राजकारणाच्या क्षेत्रात कार्यकर्ते आपल्या नेत्यावर किती प्रकारे प्रेमकरू शकतात त्याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल


0 Comments