मिरज- परळी वैजनाथ- मिरज रेल्वे सुरू कराव्यात :-शहीद अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी) तीन वर्षापासून बंद असलेली मिरज- श्री क्षेत्र परळी वैजनाथ- मिरज रेल्वे सुरू करावी या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे संघटना बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने रेल्वे विभाग सोलापूर यांना देण्यात आले.
गाडी क्रमांक -51425 &51426 मिरज -परळी वैजनाथ -परळी -मिरज गेल्या 3 वर्षांपूर्वी कोरोना काळात या रेल्वे सेवा बंद केलेल्या होत्या पण सर्व विभागात रेल्वे सुरू होत असताना सोलापूर विभागात अनेक रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत त्यापैकी मिरज -परळी ही अतिशय कुर्डूवाडी, बार्शी ,उस्मानाबाद, येडशी ,लातूर व मराठवाड्याशी जोडणारी सोईस्कर ,उपयुक्त रेल्वे आहे .
महाराष्ट्र शासनाने या पुढील काळात गणेशोत्सव ,दहीहंडी यासारखे उत्सव निर्बंध मुक्त केले आहेत आज पासून हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा श्रावण मास सुरू होत असून गेल्या तीन वर्षांपासून श्रावणामध्ये अनेक प्रवासी भक्तांना परळी वैजनाथ येथील असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी दर्शनास कोरोनामुळे जाता आले नाही सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे या श्रावण महिन्यात ही श्री क्षेत्र परळी वैजनाथ गाडी सुरू करून भावी भक्तांची होणारी गैरसोय दूर करावी अशी अनेक प्रवाशांनी कामठे संघटनेकडे मागणी केली आहे
याची दखल घेऊन सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक ,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर ,खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनाही या मागणीच्या प्रती देण्यात आले आहेत तरी रेल्वे विभागाने या मागणीची दखल घेऊन तात्काळ रेल्वे सेवा सुरू कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.


0 Comments