google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्त्वाचे ! सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या एवढ्या जागा असणार

Breaking News

महत्त्वाचे ! सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या एवढ्या जागा असणार

 महत्त्वाचे ! सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या एवढ्या जागा असणार 

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर कराव्यात असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये आता ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेत ३१ जागा तर सोलापूर जिल्हा परिषदेत २१ जागा ओबीसी उमेदवारासाठी राखीव असणार आहेत.

बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या ५० टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बँकवर्ड क्लास ऑफ सिटिझन या प्रवर्गामध्ये ओबीसींचा समावेश करून त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बँकवर्ड क्लास ऑफ सिटिझन वा घटकामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे ओबीसी तसेच विमुक्त जाती आणि जमातींचा समावेश केला जातो. बँकवर्ड क्लास ऑफ सिटिझन हा प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

साधारण ६ टक्के जागा कमी झाल्या

बांठिया आयोगाने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील काही जिल्ह्यात ० टक्के आरक्षण आहे. काही जिल्ह्यात ओबीसींच्या जागा कमी झाल्या आहेत. या सर्वांचा विचार करता पूर्वीपेक्षा साधारण ६ टक्के जागा कमी झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments