पावणेदोन लाखांची गाडीला अडकवलेली पिशवी पळवली सांगोल्यातील घटना : शेतकऱ्याला टोपी
बँकेतून काढलेले १ लाख ७० हजार रुपये भर दुपारीच चोरट्यांनी पळवले १,७०,००० / - रुपये रोख रक्कम व युनियन
सांगोला ( प्रतिनिधी ) : - अनोळखी मोटारसायकल वरून आलेल्या इसमांनी १ लाख ७० हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे असणारी पिशवी पळवून नेली असल्याची घटना सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे काल २६ जुलै रोजी भर दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , अविनाश गायकवाड ( रा . एखतपुरता.सांगोला ) यांनी काल दि . २६/०७/२०२२ रोजी दुपारी १२ वा . चे सुमारास युनियन बँक शाखा सांगोला येथून सोने सोडविण्याकरीता बचत खात्यातील १,७०,००० / - रुपये काढले होते .
सदरची रक्कम जवळील पिशवी मध्ये ठेवून मोटार सायकलवरून मुजावर गल्ली येथील जाधव यांचे ज्वेलर्स दुकानात गेले . त्यावेळी गाडी स्टॅन्डला लावून उतरत असताना पाठीमागून एक अनोळखी मोटारसायकल स्वार वत्यावरती बसलेल्या इसमानी अडकवलेली पिशवी नकळत काढून घेऊन पळून गेले . त्याच वेळी सदर मोटारसायकलचे पाठीमागे आरडाओरडा पळत असताना सदरील अनोळखी इसम हे मोटारसायकल वरून पळून गेले होते .
अज्ञात चोरट्याविरुध्द१,७०,००० / - रुपये रोख रक्कम व युनियन बँकेचे चेकबुक , पासबुक , आधारकार्ड , पॅनकार्ड , ड्राव्हिंग लायसन , दोन फोटो , इत्यादी • कागदपत्रे चोरुन घेऊन गेल्याचे फिर्यादीमध्ये . नमुद करण्यात आले आहे . घटनेची फिर्याद अविनाश गायकवाड रा.एखतपुर यानी दिली असून अधिक तपास सांगोला पोलीस करीत आहेत . चोरीच्या घटनेमुळे शहर व परिसरातील नागरिक भयभीत झाले असून , पोलिसांनी या चोरट्यांच बंदोबस्त करावा , अशी मागणी शहरवासी करीत आहेत .
बँकेतून १ लाख ७० हजार रुपयांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे घडली असून दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .


0 Comments