धक्कादायक !भाच्याच्या मदतीने पतीची हत्या , प्रेयसी मामी आणि प्रियकर भाच्याला अटक
मुंबई एका धक्कादायक घटनेने हादरली आहे . मुंबईतील सकिनाका परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं धक्कदायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
मृत व्यक्तीचं नाव नसीम शेख असं असल्याचं समजतं आहे. या हत्या प्रकरणात मृत नसीमची पत्नी रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मामी रुबिना शेख हिच्यासोबत आपला भाचा मोहम्मद सैफ याचे प्रेमसंबंध होते. याच गोष्टीचा संशय नसीमला आल्यानंतर त्याने वारंवार पत्नी रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने नसीम याची गळा दाबून हत्या केली.
याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रारी दाखल केली. सून रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तीक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवला. असं या तक्रारीत म्हटलं आहे.या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी तात्काळ दोन्ही आरोपींचा शोध घेतला.


0 Comments