धक्कादायक ! अव्वल कारकून उमेश वैद्य यांचा अपघाती मृत्यू ; जिल्हा प्रशासनावर शोककळा
सोलापूर : कोर्टाच्या कामानिमित्त मुंबईला निघालेल्या शासकीय वाहनाचा अपघात होऊन प्रांताधिकारी क्रमांक दोनचे अव्वल कारकून यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी आहे तर ड्रायव्हर सुदैवाने बचावला आहे.
उमेश वैद्य वय 48, राहणार मोहिते नगर सोलापूर असे मरण पावलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व आई असा परिवार आहे. वैद्य हे माढा तालुक्यातील लऊळ या गावचे मूळ रहिवासी होते. यापूर्वी त्यांनी मंडल अधिकारी, लऊळ, उप जिल्हा निवडणूक कार्यालय अव्वल कारकून होते आता प्रांताधिकारी क्रमांक 2 येथे तीन वर्षांपासून अव्वल कारकून पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर इंदापूर येथे शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत सोलापुरात आणण्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मुंबईला जात होते, सकाळी साडे सात वाजता भिगवण जवळ त्याचे वाहन कंटेनरला जाऊन धडकले आणि हा गंभीर अपघात झाला.


0 Comments