google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पहाटे झोपेत असताना तलाव फुटला अन् पुढं जे झालं..

Breaking News

पहाटे झोपेत असताना तलाव फुटला अन् पुढं जे झालं..

 पहाटे झोपेत असताना तलाव फुटला अन् पुढं जे झालं..

नागपूरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांच्या घरात पुराचे, पावसाचे पाणी शिरले आहेत आणि शेतीचं नुकसान होऊन शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शिवारातील 13 हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे.


नागपूरमध्ये दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आल्याने नागपूर ग्रामीणमधील जुनापाणी या गावातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव शुक्रवारी सकाळी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे तेथील गावातील 181 पाळीव जनावरे वाहून गेली आहेत, असं सांगण्यात येत आहे. यामध्ये बकऱ्या, बैल, गायी, वासरू, अनेक कोंबड्यांचा देखील समावेश आहे. या घटनेने माळीण घटनेची आठवण करून दिली आहे.पाहते गाव साखरझोपेत असतानाच तलावातून पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने तसेच शेतीच्या दिशेने आला. गावकऱ्यांनी वेळीच गावाजवळच्या उंच भागाकडे धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात माती आणि चिखल सर्वत्र पसरला आहे. गावकऱ्यांनी आसपासच्या नातेवाईकांकडे तात्पुरता आश्रय घेतला आहे. गावातील नुकसानीचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सादर केला आहे.


गावकऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, पहाटे तलावाचा बांध फुटल्यामुळे सगळीकडे लोकांचे आवाज घुमू लागले. तलावाचे पाणी गावात पहाटे 5 वाजता शिरल्याने गाव झाेपेत असतानाच अचानक सगळीकडे आरडाओरड ऐकू आला. या अनेकांनी जीव वाचविण्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांनी टेकडीकडे धाव घेत जीव वाचवला, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि घरातील अन्नधान्य सुद्धा वाहून गेल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शासनाकडे मदतीची मागणी आहे, ती मदत तातडीने करावी, अशी गावकऱ्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments