तिरंगा फडकावण्याच्या नियमांत मोठा बदल, मोदी सरकारचा महत्वाचानिर्णय…!!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मोदी सरकारने येत्या स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी तिरंगा फडकावण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत नागरिकांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपला राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आता नागरिकांना आपल्या घरावर रात्र न् दिवस तिरंगा फडकावता येणार आहे.. तसे पत्र केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केले आहे.
नियमांत मोठे बदल
भल्ला यांनी 20 जुलै रोजी सर्व सचिवांना हे पत्र पाठवले असून, त्यात तिरंगा फडकावण्याचे नवे नियम 20 जुलैपासूनच लागू होणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय ध्वज संहिता-2002 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोणत्याही मोकळ्या जागेवर, लोकप्रतिनिधींच्या घरावर आता दिवस रात्र तिरंगा फडकावता येणार आहे.
केंद्रीय गृहसचिवांनी पत्रात म्हटलं आहे, की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, घरोघरी तिरंगा चळवळ बळकट करू या… 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घराघरी तिरंगा फडकावा. सरकारला अपेक्षा आहे, की 13 ऑगस्ट रोजी सुमारे 30 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल.. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन घरावर तिरंगा फडकावा, असे आवाहन करण्यात आलेय..
दरम्यान, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलंय.. त्यात असं म्हटलं आहे, की “आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.. प्रत्येक घरी तिरंगा चळवळ मजबूत करू या. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावा किंवा घरात लावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल..


0 Comments