google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा”: ‘यांची’ मागणी!

Breaking News

“विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा”: ‘यांची’ मागणी!

 “विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा”: ‘यांची’ मागणी!

मुंबई :  एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तसेच,  महाविकास आघाडीच्या अजित पवारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. तर विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा , अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

नाना पटोले म्हणाले, 'राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आमदारांना बोलावले आहे. त्या संदर्भात आम्ही बैठक घेत आहोत. विधानपरिषद व विधीमंडळात आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित होते, याची दखल दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यानुसार दिल्लीतील वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील'. दरम्यान, विधानपरिषदेत आमचा विरोधी नेता व्हावा, प्रमुख मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला.

Post a Comment

0 Comments