Breaking News

सिगारेट मागण्याच्या वादातून मित्रानेच केली १५ वर्षीय मित्राची हत्या!

 सिगारेट मागण्याच्या वादातून मित्रानेच केली १५ वर्षीय मित्राची हत्या!

पुणे :  मोशी येथील जंगलात सिगारेट मागण्याच्या वादातून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे.  सदर घटना काल दुपारी मोशी टोलनाका येथील जंगलाजवळ घडली आहे. सुमित बनसोडे वय वर्ष १५ असं हत्या झालेल्या मुलाचे  नाव आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  सुमितच्या मित्रांची कबुतरांची ढाबळ कोणीतरी तोडायला येणार आहे. अशी उडवा उडवीची माहिती सुमित आणि त्याच्या मित्राला मिळाली होती. त्यामुळे सुमित आणि त्याचे मित्र ढाबळ तोडायला येणाऱ्या टोळक्याला मारण्यासाठी कोयते आणि काट्या घेऊन मोशी जकात नाक्याजवळील जंगलात दबा धरून बसेल होतें. मात्र, त्या ठिकाणी ढाबळ तोडणारा टोळकं आलाच नाही. हे सर्वजण ज्या ठिकाणी दबा धरून बसले होते.


दरम्यान,  त्याच ठिकाणी सुमित आणि त्याच्या मित्रांमध्ये सिगारेट मागण्यावरून किरकोळ वाद झाला आणि या वादातच सूमितच्या काही मित्रांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून केला.

Post a Comment

0 Comments