google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी

Breaking News

प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी

 प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी

महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांशी संबंधित संस्थेतील प्रकार

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतील एका प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड मधील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. तशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. पण, आता थेट त्यांनी हात धरून शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.

Post a Comment

0 Comments