मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार
विटा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा भरधाव दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला . ही घटना आज ( दि . 1 ) पहाटे विटा - मायणी रस्त्यावर गार्डी हद्दीत घडली . सुवर्णा चंद्रकांत पाटील ( वय 45 , रा . गार्डी ) असे मृत महिलेचे नाव आहे . याप्रकरणी उमेश शिवाजी पाटील ( सध्या रा . विटा , मूळ रा . चिखलहोळ , ता . खानापूर ) याच्याविरोधात मृत महिलेचा भाचा रोहित कदम यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे
याबाबत पोलिसांनी सांगितले की , गार्डी येथील सुवर्णा पाटील शुक्रवारी पहाटे सव्वा पाच वाजता विटा - मायणी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या . त्यावेळी गार्डी गावाच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाच्या पुढील वळणावर उमेश पाटील भरधाव मोटरसायकल ( क्रमांक , एमएच 10 डी एस -7129 ) वरून निघाले होते .
त्यांच्या दुचाकीने सुवर्णा पाटील यांना पाठीमागून जोराची धडक दिली . यात त्यांचा जागीच मृत्यू झाला . तर दुचाकीस्वार उमेश पाटील हे जखमी झाले आहेत .याप्रकरणी उमेश पाटील यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


0 Comments