सांगोला नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले मतदान १८ ऑगस्टला ; आचारसंहिता लागू , इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
सांगोला : सांगोला नगरपालिका निवडणुक तारीख जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने काल शुक्रवार दि . ८ रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे . सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १ ९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे . ११ प्रभागातून २३ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत .
डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपलेल्या सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रारूप मतदार याद्या व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून यावरअर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे . यासह १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ वा . ३० मी . ते सायंकाळी ५ वा . ३० मी . पर्यंत मतदान प्रक्रियापार पडणार आहे .
तर १ ९ ऑगस्ट रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे . सांगोला नगरपालिका निवडणुकीत या पूर्वी २० नगरसेवक २ स्वीकृत नगरसेवक निवडून दिले जात होते . २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला नगरपरिषदेची ३४ हजार ३२ ९ लोकसंख्या आहे . त्यानुसार १ नगरसेवक १ हजार ४ ९ २ लोकांचे प्रतिनिधित्व म्हणजे एका प्रभागातील २ सदस्य , २ हजार ९ ८४ लोकांचे प्रतिनिधित्व करणार आहे .
उद्याच्या निवडणुकीत एकूण २३ सदस्य निवडून द्यायचे आहेत . १ ते १० प्रभागात २ नगरसेवक असे २० नगरसेवक तर१ ९ प्रभागातून एकूण सदस्य असे एकूण २३ येणार आहेत . त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून काल शुक्रवारीच उमेदवार आणि मतदारांची सुरु झाली असून सर्वांचे लक्ष लागूनराहिलेल्या सांगोला नगरपालिका भावी नगरसेवक रात्रीपासून कामाला लागल्याचे दिसून आले . परंतु मतदार राजा कोणाला कौल देणार हे लवकरच होणार आहे .


0 Comments